संक्रांतीला काय वाण द्यावे हळदी कुंकवाला काय वाण द्यावे हा प्रत्येक स्त्रीला प्रश्न पडतो.
तर आपण आज घेऊन आलो . प्रत्येक स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला द्यायला हवे , मागे देणे मध्ये पण काही गोष्टींचे तथ्य आहे आणि त्याचे महत्त्व पण आहे ते आपण जाणून घेणार आहोत. वाण पण असे द्यायला हवे की जे उपयोगाला येईल.
1.हळदीकुंकू करंडा
हळदी कुंकू हे सौभाग्याचे लेणे आहे, त्यामुळे तुम्ही हळदी कुंकू वाण म्हणून देऊ शकता.
2.नारळ – नारळ हे प्रत्येक शुभ मुहूर्तावर वापरले जाते. नारळ हे शुभतेचे प्रतीक आहे. म्हणून वाण म्हणून नारळ देऊ शकता.
3.ब्लाउज पीस:- महिलांची ओटी भरताना ब्लाऊज पीस हे दिले जाते, ही पण एक खूप सुंदर कल्पना आहे.
4.रोपटे:– वाण म्हणून तुम्ही एक छोटेसे रोपटे बायकांना देऊ शकता.
5.मसाले:– वेगवेगळ्या कंपनीची छोटी छोटी मसाले पुडी भेटतात, ते पण तुम्ही वाण म्हणून देऊ शकता ,ते बायकांना उपयोगी सुद्धा येऊ शकते स्वयंपाकामध्य(यामध्ये पावभाजी ,पनीर भाजी, बिर्याणी मसाला ,पाव भाजी मसाला, गरम मसाला ,शाही मसाला , छोले मसाला अशा प्रकारचे मसाले देऊ शकता.)
6.आरसा :- हे अशी वस्तू आहे की प्रत्येक स्त्रीला हवीशी वाटते आणि ते केव्हाही लागू शकते ,त्यामुळे छोटासा आरसा जो की पर्समध्ये मावेल असा वाण म्हणून देऊ शकता.
7.खणाची पर्स किंवा बटवे :– स्त्रियांची आवडती वस्तू म्हणजे पर्स किंवा बटवे. बाहेर जाताना स्त्रियांना मोबाईल ठेवायला पैसे ठेवायला किंवा काही वस्तू ठेवण्यासाठी पर्स किंवा बटवे हे लागतातच आणि हे अत्यंत उपयोगी वस्तू आहे त्यामुळे तुम्ही पर्स वाण म्हणून देऊ शकता.
8.रेसिपी बुक : स्वयंपाक म्हणजे बायकांच्या जिव्हाळ्याचा विषय , त्यासाठी तुम्ही बायकांना रेसिपी बुक देऊ शकतात, त्यामधील रेसिपी त्यांना उपयोगी नक्कीच पडतील.
संक्रांतीला काय वाण द्यावे
9.कॅलेंडर:– संक्रांत हा सर जानेवारी मध्येच येतो म्हणजे पुढील 11 महिने वर्षभराचे आपल्या हातात असतात .तर तुम्ही त्यासाठी वाद म्हणून कॅलेंडर पण देऊ शकता. जे की वर्षभर पूर्ण परिवाराला उपयोगी पडण्यासारखे आहे.
10.साडी पिन :– तुम्ही वाण म्हणून साडी पिन ही देऊ शकता हे खूप सुंदर आयडिया आहे जे बायका साडी घातल्यावर वापरू पण शकतात.
11.कापसाच्या वाती:- कापसाच्या वाती वाण म्हणून दिल्या , तर त्या योग्य उपयोगालाही येतील आणि घरोघरी देवासाठी वापर होईल.
12.हात रुमाल :- हात रुमाल ही वस्तू वाण म्हणून दिले तर सगळ्यांनी बायकांना उपयोगी पडेल आणि त्या वापरतील सुद्धा.
13.मेहंदी कोन:– मेहंदी कोन हे अशी एक भन्नाट कल्पना आहे मेहंदी कोण तुम्ही बायकांना देऊ शकता त्या सणाला मेहंदी काढू शकतील.
14.पाणी बॉटल :- आपण संक्रांतीचे वाण म्हणून पाणी बॉटल देऊ शकतो.
15.बॅग क्लिप्स -अशा बॅग क्लिप्स ज्या की आपण प्लास्टिकच्या पिशवी मधून काही वस्तू वापरले तर ते उघडे राहून त्या वस्तू किंवा खाद्यपदार्थ खराब होतात, त्या असतील तर ते आपण हवा बंद करू शकतो.
अशाप्रकारे चमचे, वाट्या, शाम्पू ,गजरे ,गुळाची छोटीशी ढेप आणि बऱ्याच काही वस्तू आपण संक्रांतीचे वाण म्हणून देऊ शकतो.
संक्रांतीला काय वाण द्यावे
नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्य शुभेच्छा
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
संक्रांतीला काय वाण द्यावे
आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube