संक्रांत उखाणे

संक्रांत उखाणे

संक्रांत उखाणे

आई वडिलांसारखी माया नसते कोणाला, —- रावांचे नाव घेते संक्रांतीच्या सणाला.

पुरणपोळीचा स्वाद येण्यासाठी त्यात घालतात गूळ, —- रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ.

हळदी कुंकू साठी जमल्या साऱ्या बायका,
—- रावांचे नाव घेते सर्वांनी ऐका.

ऊसापासून बनवतात गूळ,
—- रावांचे नाव घेते मैत्रीणीना वाटते तिळगुळ.

मोत्यांची माळ, सोन्याचा साज ,
—- रावांचे नाव घेते , संक्रांत आहे आज.

गोकुळासारखं सासर,
सारे कसे हौशी,
—- रावांचे नाव घेते , संक्रांतीच्या दिवशी.

रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास,
—- रावांचे नाव घेते, संक्रांतीला खास.

गुलाब पेक्षा मोहक दिसते , गुलाबाची कळी ,
रावांचे नाव घेते , संक्रांतीच्या वेळी.

तिळा सोबत गुळाचा , गोडवा किती छान,
—- रावांचे नाव घेऊन , देते संक्रांतीचे वाण.

हिमालय पर्वतावर बर्फाचे राशी,
—- रावांचे नाव घेते , मकर सक्रांतीच्या दिवशी.

चांदीच्या ताटात रेशमी खण, —- रावांचे नाव घेते , संक्रांतीचा आहे सण.

सृष्टी सौंदर्याच्या बागेला, चंद्र सूर्य झाले माळी,
—- रावांचे नाव घेते , हळदी कुंकवाच्या वेळी.

काकवी पासून बनवतात गूळ,
—- रावांचे नाव घेऊन वाटते तिळगुळ.

तिळगुळ घ्या गोड गोड बोला,
—- रावांचे नाव घेण्याचे , सौभाग्य लाभले मला.

तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत,
—- रावांच प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित.

घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण,
—- रावांचे नाव घेते , संक्रांतीचे कारण.

निसर्ग निर्मितीच्या वेळी, सूर्यनारायण झाले माळी, —- चे नाव घेते संक्रांतीच्या वेळी.

सासू आहे प्रेमळ, नणंद आहे हाउशी,
—- रावांचे नाव घेते , मकर संक्रांत च्या दिवशी.

गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत ,
—- रावांच नाव घेते संक्रांत च्या पूजेत.

तिळासारखा स्नेह, गुळासारखी गोडी, —- रावांचे नाव घेते सुखी असावी जोडी.

तिळगुळ घ्या गोडगोड बोला, —- शी लग्न झाले , वर्ष झाले सोळा.

कपाळाचे कुंकू जसा चांदण्याचा ठसा,
—- रावांचे नाव घेते , हळदी कुंकवाला बसा.

संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान —-रावांच्या नावावर देते हळदी कुंकाच वान.

मकर संक्रांती म्हणून , ठेवला आहे मी उपवास
—- रावांचे नाव घेते , आयुष्यभर असुदे त्यांचा सहवास.

संक्रांतीच्या सणाला आहे, सुगड्यांचा मान,
—- रावांच्या नावावर देते, हळदी कुंकवाच्या वाण.

माहेरच्या मायेला, नाही कशाची सर,
—- रावांच्या सहवासात, न वाटे कसली कसर.

देवापुढे ठेवण्यासाठी आणले, नारळ आणि केळी, —- रावांचे नाव घेते, मकर संक्रांत च्या वेळी.

संक्रांतीच्या दिवशी , पतंग उडवतात आकाशात, —- रावांच्या सहवासात, आले सुख जीवनात.
गमतीदार उखाणे

ताटात होती जिलेबी, त्याला लागली मुंग्यांची रांग . —- रावांचे नाव घेते , तुमच्या नानाची टांग.😂

प्रेमाने भरवते मी कोंबडी वाड्याचा घास, पण —- रावांना आहे , मुळव्याधचा त्रास.😂

तांदूळ निवडताना, भेटतात खूप खडे,
—- रावांना आवडतात , गरम बटाटे वडे.😂

बिजनेस्मध्ये झाला गेल्या वर्षी तोटा, तरीपण —- रावांनी उडवल्या जातात , लग्नात १०० च्या नोटा.😂

चांदीची बाईक तिला सोन्याचा सीट,
—- राव म्हणतात चल जाऊ डबल सीट.

चांदीच्या ताटात साखरेचे पेढे, —- माझे हुशार, बाकी सगळे वेडे.🤪

आकाशात उडतो पक्षांचा थवा, —- चे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.😉

वेड्याला इंग्रजी मध्ये म्हणतात सायको, —- रावांचे नाव घेते , बनून त्यांची बायको.🥰

चांदीच्या ताटात मटणाचा रस्सा,
—- रावांचे नाव घेते सर्वजण हसा.😂

संक्रांत उखाणे

बटाट्याच्या भाजीला स्वादिष्ट मसाला, —- रावांच नाव माहीत असून विचारता कशाला.🤩

उखाणा सांगते मी खूपच इजी,
माझे —- राव राहतात नेहमी बिझी.🤭

नदीतील वाळू चाळणीने चाळू —- राव म्हणतात चल पब्जी खेळू.😜

नदीच्या काठावर कृष्ण वाजवतो बासरी,
—- रावांसोबत सोबत आली मी सासरी.🙂

गुलाबाच्या झाडाला पाणी घालतो वाकून,
—- चे नाव घेतो अर्धी क्वार्टर टाकून.🤗

कॉलेजमध्ये असताना होती मी याची दिवानी —-याचं नाव घेते आता खाऊन चिकन बिर्याणी.😋

रुणझुण येत होती, खिडकी वाट पाहत होती ,खडकीला तीन तारा, अडकित्ताला घुंगरू 12 ,पान खाती तेरा तेरा —-राव बसले पलंगावर मी घालते वारा.😉

चांदीच्या ताटावर गाजराचा हलवा —- रावांच नाव घेते सासूबाईंना बोलवा.😅

बटाट्याला हिंदी मध्ये म्हणतात आलू —- राव दिसतात साधे पण आहेत खूप चालू.😍

लग्नात मागितला हुंडा एक खोका —- रावांचे नाव घेते कुणीतरी यांना लाडक्याने ठोका.😁

आंब्याच्या फांदीवर पाय कसा ठेवू —- बरोबर घेऊन बारशाला येऊ.😉

बशी मध्ये ठेवला चहाचा कप —- ला म्हटलं चल फिरायला स्टॅन्ड अप.😁

भूगोलाच्या पुस्तकाला इंग्रजीचे कव्हर ते माझे पती मी त्यांची लवर.🤠

हिवाळ्यात दिसतो फुलांना बहर — रवांशी लग्न केले कारण आली लहर केला कहर.🤡

काल झालं आमचं लग्न लग्नात आला होता बँड वाला —- रावांचे नाव घेते झुकेगा नही साला.😎

भारत देश स्वतंत्र झाला इंग्रज गेले पळून —- रावांचे नाव घेते जरा पहा मागे वळून.🤑

कापला टोमॅटो कापला कांदा.—- पाहून झाला माझा वांदा .😎

रुपयाचे थाट त्यावर सोन्याची ठसे, —- रूप पाहून चंद्र सूर्य असे .🥰

फुलांच्या तोरणात आंब्याचे पान —- ला पाहून झालो मी बेभान.🤩

हा दिवस आहे आमच्याकरिता खास —- ला देतो गुलाबजामचा घास .🥳

संक्रांत उखाणे

अबोलीच्या फुलाचा गंध काही कळेना —- चे नाव घेणे शब्द काही जुळेना.😉

जुईच्या वेलीवर लागली सुगंधी नाजूक फुले —-
आणि मला दोन गोड मुले.😝

दूध, दही , लोणी —- रावांचे नाव घेते मी त्यांची राणी.🤪

स्वयंपाक येत नाही म्हणून राव माझ्याकडे रागावले, मग काय पहिल्या दिवशी जेवण मी झोमॅटो वरून मागवले.😊

केळीच्या पानावर पाय कसे ठेवू ,लग्न नाही झालं तर नाव कशी घेऊ .

व्हिस्किपेक्षा छान आहे व्होडका, आपल्या लग्नानंतर भाजी बनविण दोडका.

संक्रांत उखाणे

मराठी उखाणे
नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्य शुभेच्छा
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

साखरपुडा शुभेच्छा

आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube

Leave a Comment