300+ मराठी उखाणे

300+ मराठी उखाणे

जाईच्या वेणीला चांदीची तार—-माझी लाखात सुंदर नार…!

शिवरायाच्या माथ्यावर भवानी मातेचा हात —-रावांची अन् माझी साता जन्माची साथ.

300+ मराठी उखाणे

मंगळसूत्र हाच सौभाग्याचं दागिना खरा —- रावांचे नाव घेऊन जपते मराठी परंपरा.

लग्नाच्या सोहळ्यात रुखवत मांडला भारी —- रावांचे नाव घेते मांडवाच्या दारी.

तुळशीला घालते प्रदक्षिणा विष्णूला करते नवस, —- रावांचे नाव घेते , आज आनंदाचा दिवस.

श्रीकृष्णाने पण केला रुक्मिणीला च वरीन —- रावांच्या जीवनात आदर्श संसार करीन.

300+ मराठी उखाणे

राजा राणीच्या संसाराचा प्रवास आहे नवा, —- रावांचे नाव घ्यायला उखाणा कशाला हवा.

मळ्याच्या मळ्यात मोगरा दाट पिवळ्या शालू ला जरीचे काठ —- रावांचे नाव घेते ,सोडा आमची वाट.

आई वडिलांनी केले लग्न लग्नानंतर केले कन्यादान, —- रावांना मिळाला जावयाचा मान.

नववारी साडी आहे महाराष्ट्राची शान, —- राव आहेत माझा स्वाभिमान .

प्रेमरूपी दिव्यात लावते प्रितीची वात, —- रावांचे नाव घ्यायला केली आजपासून सुरुवात.

नात्यांच्या मंदिराला सोन्याचा कळस , —- राव आमचे आहेत सर्वापेक्षा सरस.

मंगळसूत्रातील दोन वाट्या सासर आणि माहेर —- रावांनी दिला मला सौभाग्याचा आहेर !!

मोग्ऱ्याचा गजरा गुलाबाचा हार , —- रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार.

प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा,
शोधून सापडणार नाही —- सारखा हिरा.

हळदी कुंकू ठेवायला चांदीच तबक त्यासोबत अत्तरदाणी शोभे सुबक बसायला चंदनाचा पाट जेवायला सोन्याचं ताट खायला मोत्याचा घास —-चं नाव घेते तुमच्यासाठी खास.

मनाच्या शिंपल्यात जपावा आठवणींचा मोती —- रावांशी अशीच फुलत राहावी साता जन्मांची नाती.

वडाच्या झाडाला गुंडाळते सफेद धागा —- रावांच्या जीवनात सदैव असुदे माझ्यासाठीच जागा.

रातराणी च्या सुगंधाने निशिगंध झाला मोहित , दीर्घायुष्य मागते —- रावांच्या सहित.

रामाने सीते साठी , उचलले शिवधनुष्य —-
रावांसाठी मागते , देवाकडे दीर्घायुष्य.

सौभाग्याचं कुंकू कपाळी सजलं, पत्नीच्या नात्याने —- रावांना मनोमनी पुजल.

नववधूचा साज मिरवते विणते नवी नाती ,
नव्या जगातील नवीन पाऊल —- रावांचा हात हाती.

नव्या दिशा, नवी आशा , नव्या घरी पदार्पण —- रावांच्या जीवनात माझे सर्वस्व अर्पण.

सूर्याच्या किरणाचा प्रकाश पडला लख्ख, माझ्यावर —- चा पूर्णपणे हक्क.

300+ मराठी उखाणे

नाजूक अनारसे साजूक तुपात तळावे —- रावांसारखे पती जन्मोजन्मी मिळावे.

दवबिन्दुच्या थेंबाने चमकती फुलांचा रंग सुखी आहे संसारात सी ….. च्या संग.

राधेचे श्वास जपती कृष्ण नामाची माळ, बदलला माझ्या आयुष्यातील काळ … रावांच्या मुख दर्शनाने होते माझी सकाळ.

देवाच्या पूजेला मांडले सोन्याचे पाट नैवद्य घालून ठेवले चांदीचे ताट ….रावांचे नाव घेते चला सोडा माझी वाट.

काळा चंद्रकळा त्याला नेसण्याची खुबी……… रावांची मूर्ती माझ्या हृदयात उभी.

आनंदाच्या लाटांनी भरले मानस सरोवर आयुष्याचा प्रवास करीन……. रावांच्या बरोबर.

पानोपानी फुल फुलावे, न्यात गहीरे रंग भरावे , —- प्रेमळ सहवासात अस्तित्व मी माझे विसरावे.

मोहमाया स्नेहाची जाळी पसरल घनदाट…. च्या बरोबर बांधली जिवनगाठ.

300+ मराठी उखाणे

सासू सासऱ्यांची सून वहिणी मी दिर-नंदेची जाऊबाईचा स्वभाव आठव आठवण येई बहिणीची सोन्यासारख्या सासरी माझे मन रमते मला खुश ठेवायचं अहोना छान जमते.

वार्यासंगे तार्यासंगे छेडीत जातो छंद मनाचा, ……रावांसगे हात गुंफून मार्ग चालते जीवनाचा.

दत्त दत्त दत्ताची गाय गायीच दूध दूधाच दही दह्याच ताक ताकाची लोणी लोण्याचे तुप तुपात बनवला प्रसादाचा शिरा त्यात घातले काजू, पिस्ता, बेदाणा … रावांच नाव घेते सांगा कसा वाटला उखाणा.

सोन्याच्या दागिन्यांनी सजली नवरी नवरीच्या गळ्यात नाजुकशी सरी मोठ्यांदा बोलते नका टवकारु कान……… रावांचे नाव घेते राखून तुमचा मान.

संसाराच्या देवाऱ्यात उजळतो नंदादीप समाधानाचा —- रावांचे नाव घेऊन, आशिर्वाद मागते सौभाग्याचा.

द्राक्षांच्या वेलीला त्रिकोणी पान, बाबा हिंडले हिंदुस्थान, तेव्हा सापडले —- राव छान.

ताटभर दागिन्यांपेक्षा, माणसं असावी घरभर, —-रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा जन्मभर.

सुरत ला गेलो बांधायला , लग्नाचा बस्ता —- रावांचे नाव घेते सोडा माझा रस्ता.

हाताने करावे काम, मुखाने म्हणावे राम, ……. रावांचे चरण, हेच माझे चारही धाम.

नको मोहन माळ, नको हिऱ्यांचा हार —- रावांच्या जीवनात मी सुखी आहे फार.

लक्ष्मी माते वंदन करते, मनी श्रध्देचे बळ,
—- रावांच्या संसारी दे, समृद्धीचे फळ.

आभाळ एवढं प्रेम माझ्या नशिबात आलं, त्यांची सोबत माझं जगणं झालं —- रावांच नाव घेते मन उडू उडू झालं.

आवडता ऋतू आहे , माझा पावसाळा,
—- रावांचा आहे , मला खूप जिव्हाळा.

पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते, चातकपक्षाची काया, —- रावांच्यामुळे मिळाली आईवडीलांच्या रुपात सासू सासऱ्यांची माया.

पर्जन्याच्या आगमनाने ओलीचिंब होते धरती, … …..रावांच्या जीवनरथाची मी झाले सारथी.

जाई जुईच्या फुलांची विणलेली आहे जाळी, देवाच्या नैवेद्यासाठी आहेत पिवळीधमक केळी, पंचामृतच्या फुल पात्रात आहे चांदीची पळी, सभोवताली जमलेली आहेत आरतीसाठी मित्र मंडळी, आनंदाने पडत आहे टाळी वर टाळी, सर्वांमुळे पूजेला शोभा आली आगळी वेगळी, आणि एवढ्या मोठ्या उखाण्यात …. …. रावांच नाव विसरायला मी का आहे वेडी खुळी.

तुळशीला घालते प्रदक्षिणा, विष्णूला करते नवस —- रावांचे नाव घेते आज आनंदाचा दिवस.

माणसं तिच बदलली नाती नाही बदलली माया… … रावांच्या साथीने आता रचते सुखी संसाराचा पाया.

दारापुढ ओटा ओट्यावर वृंदावन त्यात लावल तुळशीच झाड, … … राव पुरवतात माझे सर्व लाड.

विठू माऊली तू माऊली जगाची, जगात आहे तुझी किर्ती….. रावांच्या मनात अमर आहे विठ्ठलाची मूर्ती.

अशा प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.

आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube

नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Comment