नवीन वर्षाचे संकल्प

नवीन वर्षाचे संकल्प
दरवर्षीप्रमाणे यावरही आपण नवीन वर्षाचे म्हणजेच 2024 या वर्षाचे स्वागत करणार आहोत तर आपण छान अशा साध्या आणि सोपे अकरा संकल्प करण्यासाठी पाहणार आहोत.


आपल्याला आपल्या जीवनात ज्या परिवर्तनाची गरज आहे , त्यानुसार आपल्याला संकल्प करायचा आहे.
किंवा ज्या संकल्प मुळे तुमच्या मध्ये काहीतरी बदल होणार आहेत असे संकल्प आपण पाहणार आहोत.
असे संकल्प निवडा आणि वर्षभर रोज फॉलो करा.
आपला संकल्प कसा पूर्ण करायचा याच्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत.


१. आत्मविश्वास विकसित करा
बऱ्याच लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमी असते तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुमचे विचार तुमचे वागणं महत्त्वाचे निर्णय घेणे यामध्ये बदल घडतो तुमचा आत्मविश्वास वाढेल यासाठी तुम्हाला रोज काहीतरी कृती करायची आहे.

नवीन वर्षाचे संकल्प
२. नवीन लोकांना भेटा
नवीन लोकांना भेटल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधल्यामुळे आपलं जे जग असते त्या पलीकडची माहिती मिळते आपल्या विचारांना नवी दिशा मिळते नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि महत्त्वाचं म्हणजे आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होते.


३. अशा ठिकाणी जा ज्या ठिकाणी तुम्ही या आधी कधीच गेला नाहीत
नवीन ठिकाण प्रवास या गोष्टी माणसाला नवीन ऊर्जा नवीन प्रेरणा देतात. माणसाला घडवतात ,यामुळे आपल्यात कम्फर्ट झोनच्या बाहेर पडण्याचे धाडस निर्माण होते. जर तुम्हाला तुमच्या कॉम्पट तुमच्या बाहेर पडता येत नसेल ,तर हा संकल्प तुम्ही नक्की करून बघा.

४. रोज रात्री कृतज्ञता व्यक्त करा
आपल्याजवळ असलेल्या गोष्टींबद्दल रोज रात्री कृतघ्नता व्यक्त करणे खूप गरजेचे आहे. हा संकल्प प्रत्येकाने रोज रात्री केलाच पाहिजे. असे मी सुचवेल, यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच काही चमत्कारिक बदल होतील आणि तुमच्याजवळ जे आहे त्याचे आभार मानाने आवश्यक असते. केवळ मनापासून आभार मानून असे म्हणायचे आहे, की जे माझ्याकडे आहे ते पुरेसे आहे अजून मिळवण्याचा मी प्रयत्न करीन आणि जे मला मिळाली आहे ते माझे भाग्य समजतो आणि यासाठी आपल्याला युनिव्हर्सला धन्यवाद करायचे आहे.

नवीन वर्षाचे संकल्प

५. मेसेज करण्याऐवजी फोन कॉल करा
आज जगभरातल्या माणसांची आपण जोडले गेलो आहोत, पण आपल्याच माणसांपासून आपण दूर जात आहोत. त्यामुळे आपल्या लोकांना मित्र-मैत्रिणींना फोन करा त्यांच्याशी गप्पा मारा ,कदाचित तेही तुमच्या फोनची वाट बघत असतील, यामुळे तुमचं मन हलकं होईल .जुन्या आठवणींना उजाळा मिळेल आणि तुम्हाला आनंदही मिळेल.

६. विजन बोर्ड तयार करा

2024 मध्ये तुम्हाला तुमची कोणती स्वप्न पूर्ण व्हावेत असं वाटतं ,त्यांचे छान फोटो या व्हिजन बोर्डवर लावा. हा व्हीजन बोर्ड रोज तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी ठेवा. कारण त्यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयाशी रोज आठवण होत जाईल आणि ते पूर्ण करणे सोपे जाईल.
व्हिजन बोर्डमुळे अनेकांचे स्वप्न पूर्ण झाले आहेत त्यामुळे हा संकल्प दोन्ही नक्की करून बघा.

७. नाही म्हणायला शिका

एक गोष्ट लक्षात घ्या की आपण सर्वांना आवडू शकत नाही आणि सर्वांना संतोषही करू शकत नाही. त्यामुळे ज्या गोष्टींमुळे तुम्हाला त्रास होतो ,
त्या तुम्ही करू शकत नाही अशा गोष्टींसाठी स्पष्टपणे नाही म्हणा , बऱ्याच वेळा स्पष्टपणे नाही म्हटल्यामुळे अनेक समस्या सुटतात.

८. स्वतःमध्ये एक छोटासा बदल करा
असा कोणता बदल आहे जो तुम्ही स्वतःमध्ये करणे खूप गरजेचे आहे आणि तो बदल केल्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप चांगलं परिवर्तन घडणार आहे .असा बदल शोधून काढा आणि त्यामध्ये कशाप्रकारे बदल करता येईल यासाठी छोट्या छोट्या स्टेप फॉलो करा, या प्रकारे तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये वर्षभरात बदल घडवू शकता. असा बदल केल्यामुळे तुमचा स्वतःचा असेल कॉन्फिडन्स वाढेल आणि स्वतःकडे बघण्याची तुमची दृष्टी बदलेल.

नवीन वर्षाचे संकल्प

९. प्रेम करायला शिका

या नवीन वर्षात स्वतःवर आपल्या कुटुंबावर जगावर प्रेम करायला शिका प्रेम हे खूपच आनंददायी पॉझिटिव्ह आणि खूप छान अशी भावना आहे. जेव्हा तुम्ही या प्रकारे प्रेम करायला लागल , तेव्हा तुम्ही अतिशय प्रेमळ आनंदी पॉझिटिव्ह व्हाल .तुम्ही जर अशा प्रकारे पॉझिटिव्ह राहाल आणि प्रेम राहाल, तर तुमच्या अवतीभवतीची लोक सुद्धा प्रेमळ होतील आणि तुम्हाला जग खूप सुंदर वाटू लागेल.


१०. सोशल मीडियाचा वापर कमी करा

आठवड्यातून एकदा तरी सोशल मीडियापासून लांब राहण्याचा सराव करा यामुळे तुम्ही वास्तव जीवनाचा खऱ्या अर्थाने आनंद घ्यायला शिकाल वास्तव जीवनात काय चालू आहे याची तुम्हाला जाणीव होऊ लागेल त्याबद्दल तुम्ही जागरूक होऊ लागल म्हणून कमीत कमी एक दिवस हा सोशल मीडिया डिटॉक्स नक्की करून बघा.

१०. स्पष्ट बोलायला शिका
आपल्याला काय हवं आहे काय नको आहे याबद्दल आपले मत स्पष्टपणे मांडायला शिका कोणत्याही बाबतीत तुमचे जे विचार आहेत ते समोरच्याला न दुखवता स्पष्टपणे बोलायला शिका यामुळे तुमचे मत विचारात घेतले जाते आपल्याला काय हवं काय नको हे समोरच्याला कळतं जर तुमच्यात स्पष्ट संवाद कमी असेल तर हा संकल्प तुम्ही नक्कीच करायला हवा.

अशाप्रकारे वरील दहा टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा संकल्प करू शकता तर नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा अधिक माहितीसाठी आमच्या खालील पेजला फॉलो करू शकता.

मराठी उखाणे
नावरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मित्राला वाढदिवसाच्य शुभेच्छा
आजोबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

साखरपुडा शुभेच्छा

आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube

Leave a Comment