नवरदेवासाठी उखाणे

नवरदेवासाठी उखाणे
लग्नसराई म्हटले की उखाणे हे आलेच तर आपल्या पेजवर नवरीसाठी पण उखाणे आहेत आणि नवरदेवासाठी पण उखाणे आहेत ,खालील दिलेल्या लिंक वरून तुम्ही हवे असलेले उखाणे पाहू शकता.

चांदीच्या ताटात वाढले जिलेबी पेढे,
—— चे नाव घ्यायला कशाला मी घेऊ आणि वेडे.

ताजमहाल बांधणारे कारागीर होते कुशल,
—-राणी च नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल.

नवरदेवासाठी उखाणे

ताजमहाल आहे खूपच सुंदर,
….राणी तुमच्या सर्वापेक्षा सुंदर.

सनई चौघडा वाजतो सप्तसुरात,
—– राणीचे नाव घेतो आमच्या घरात.

निळे पाणी, निळे आकाश, हिरवे हिरवे रान,
— नाव घेतो तुमच्या सर्वांचा राखून मान.

रुक्मिणीने केला पण मी कृष्णाला वरीन,
—-राणीच्या साथीने सुखाने संसार करीन.

हत्तीच्या अंबारीला मखमली झुल,
—-राणी माझी गुलाबाचे नाजूक फुल.

चांदीच्या वाटीत खडीसाखराचे खडे,
—- च नाव घेतो देवापुढे

चहा केला नेऊन दिला चिवडा केला ताजा,
—- चे नाव घेतो पहिला नंबर माझा .

आवडतं सर्वांना पुढचं पाऊल,
—- च नाव घेतो तिला कुंकू लावून .

विटा वर विटा 36 विटा,
—–तिला सोडून सर्व फुटा.

लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव ,बदलावा लागतो स्वभाव,
—- सोबत मला मिळाला माझ्या कलागुणांना वाव.

साहेबांचा पुत्र स्वराज्याचा छावा ,
—- नाव घेतो काय तुमचा आशीर्वाद हवा.

ती आहे कारभारीन मी तिचा कारभारी,
—- चे नाव घेतो आमची जोडी लय भारी.

नवीन आयुष्याला आजपासून करतो मी सुरुवात, —-ला कायम सुखी ठेवेन वचन देतो लग्न मंडपात.

माझिया प्रियाला प्रेत कळेना म्हणता म्हणता झाली ओळख आमची
—- सोबत गाठ बांधली साधा जन्माची.

सर्व नातेवाईक मंगल कार्यासाठी जमले
—-चे नाव माझ्या मनामध्ये कोरले.

आमच्या जोडीला आशीर्वाद हवा तुमच्या सर्वांचा
—-सोबत करेन संसार सुखाचा.

नवरदेवासाठी उखाणे

समुद्रकिनारी आहे नारळाच्या बागा,
—- चा आता माझ्यावर ताबा.

पावसाळ्यानंतर येतो हिवाळा हिवाळ्यानंतर येतो उन्हाळा ,
—- आणि माझ्यातला वाढत राहू जिव्हाळा.

आडगाव गेलो पाडगाव गेलो सुंदर बायको मिळेना गेलो पिपरी आणली झिपरी तिचा आणि माझं काही जमेच ना…🤣🤣

काल झालं आमचं लग्न लग्नात आला होता बँड वाला,
—– चे नाव घेतो झुके गा नही साला.

नवीन उखाणे :-

तुळजापूरला आहे तुळजाभवानीचा वास मी भरवतो,
—- ला जिलेबीचा घास.

मोगऱ्याचा वेल पसरला दाट,
—- बरोबर बांधली जीवनाची गाठ!!!!!

रानातला मध लागतो गोड ,
माझ्या आयुष्याला मिळाली,—- ची जोड.

ऑरेंज ला म्हणतात मराठी मध्ये संत्री,
—- झाली आज माझी गृहमंत्री.

सहा आणि सहा होतात 12,
—- च्या नावात सामावलाय आनंद सारा.

प्रेमाच्या चौकात किती पण फिरा , शोधून नाही सापडणार—– सारखा हिरा.

भल्या मोठ्या समुद्रात छोटीशी होडी,
—- ची आणि माझी लाखात एक जोडी.

पेन ला मराठी म्हणतात लेखणी,
—- राणी माझी लाखात देखणी.

रात्रीच्या आकाशात चमकतात तारे ,
नाव घेतो —– चे लक्ष द्या सारे.

नवरदेवासाठी उखाणे

सागराचे पाणी चवीने असते खारे, अगं सागराचे पाणी चवीने असते खारे, तू फक्त हो म्हण …तुझ्यासाठी तोडून आणि मी चंद्र आणि तारे.

हातामध्ये हात आणि बोटामध्ये बोटं,
—- चे नाव घेतो जात नाही कुठं.

इंग्लिश च्या पुस्तकाला विज्ञानाचा कव्हर ,
—-माझी बायको मी तिचा लव्हर.

लग्नाच्या कार्यक्रमासाठी सगळे झाले जॉईन मी —- तिचा हिरो ती माझी हिरोईन.

कामाची सुरुवात होते श्री गणेशापासून,
—- चे नाव घेतो सुरुवात केली आजपासून.

नाव घ्या नाव घ्या म्हणून घालू नका वाद ,
—-चं नाव घेऊन मिळवीन सगळ्यांची दाद.

गवताला म्हणतात इंग्रजीमध्ये ग्रास,
—- चे नाव घेतो तुमच्यासाठी खास.

गमतीदार उखाणे :-

काही शब्द येतात ओठातून,
—- चे नाव घेतो हृदयातून.

चंद्रावर डाग आहे सूर्यावर आग आहे,
—– चेहऱ्यावर राग आहे तो माझ्या प्रेमाचा भाग आहे.

उभा होतो मळ्यात नजर गेली खळ्यात,
प्रेमाचा हार —–च्या गळ्यात.

आंब्याच्या झाडाखाली हरिण घेतो विसावा,
—- चे नाव घेतो आशीर्वाद असावा.

चांदीच्या बशीत मुगाचा हलवा,
—- चे नाव घेतो पटकन बोलवा.

अशा प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.

आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube

अशा प्रकारच्या नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या.

आम्हाला फॉलो करा :-
Instagram
Facebook
YouTube


नवरीसाठी उखाणे
नवरदेवासाठी उखाणे
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मित्राला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Leave a Comment